July 27, 2024

दिएगो ज्युनियर्स, दुर्गा एसएला विजेतेपद

पुणे २१ मे २०२३ – दिएगो ज्युनिअर्स अ आणि दुर्गा एसए संघाने पहिल्या अॅस्पायर चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पिंपरी येतील डॉ. हेडगेवार मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेला बॅंक ऑफ महाराष्ट्राचा पुरस्कार होता.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने अॅस्पायर इंडियाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अव्वल प्रथम श्रेणी विभागातील अंतिम सामन्यात दिएगो ज्युनियर्स अ संगाने गनर्स एफसी संघाचे आव्हान एकमात्र गोलच्या जोरावर १-० असे मोडून काढले.
सामन्यातील पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यानंतर उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला शुभम महापदीने गनर्स एफसीचा गोलरक्षक बालाजी बदनेला सुरेख चकवले आणि जाळीचा वेध घेतला. ही आघाडी कायम राखत दिएगो संगाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटात शुभमच सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
द्वितीय-तृतीय श्रेणीच्या अंतिम लढतीत दुर्गा एस.ए. संघाने देखिल सिटी एफसी पुणे संघाचे आव्हान १-० अशाच फरकाने  संपुष्टात आणले.
सामन्यातील एकमात्र निर्णायक गोल करण दुर्गाने २५व्या मिनिटाला केला. चेंडू अडवताना गोलरक्षक रोहित नागरेला चेंडूवर ताबा मिळवता आला नाही. मैदानात परत आलेल्या चेंडूचा फायदा करणने अचूक उचलला.
स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्या संघांना रोख १० हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले. उपविजेता संघ रोख ६ हजार रुपये पारितोषिकाचा मानकरी ठरला.
कुमार गटातील पारितोषिक वितरण माजी नगरसेवक बाबू नायर आणि नितीन जोशी यांच्या हस्ते पार पडले. अॅस्पायर इंडियाचे सह संस्थापक श्रीकांत अय्यरप आणि अॅलॉईस फ्रान्झ अॅग्नर यांच्या हस्ते वरिष्ठ गटाचे पारितोषिक वितरण पार पडले.
निकाल –
अव्वल प्रथम श्रेणी – दिएगो ज्युनियर्स अ १ (शुभम महापडी ४८वे मिनिट) वि.वि. गनर्स एफसी ०
वैयक्तिक पारितोषिके –
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – बर्नार्ड परेरा (दिएगो ज्युनियर्स)
सर्वाधिक गोल – शुभम महापडी (दिएगो ज्युनियर्स अ, ५ गोल)
सर्वोत्कृष्ट खेळाडू – जयंत निंबाळकर (गनर्स एफसी)
द्वितीय-तृतिय श्रेणी –
दुर्गा एस.ए. १ (करण दुर्गा २५वे मिनिट) वि.वि. सिटी एफसी पुणे ०
वैयक्तिक पारितोषिके –
सर्वोतकृष्ट गोलरक्षक – निखिल दुर्गा (दुर्गा एस. ए.)
सर्वाधिक गोल – सात्विक नायक (सिटी एफसी पुणे, ५ गोल)
सर्वोत्कृष्ट खेळाडू – स्वप्निल महामुनी (सिटी एफसी पुणे)