पुणे, दि. १९/०६/२०२३: खिडकीला दोरी आणि टॉवेल बांधून झोका घेत असताना गळफास बसून सात वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आदिती दत्तात्रय कुलकर्णी ( वय ७, रा. मल्हारीनगर, आंबेगाव, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
आदिती पाहिलीत शिकत होती. एकुलती एक मुलगी असलेली आदिती घराच्या खिडकीला बांधलेल्या झोका खेळत होती. तिची आजी घरात होती. आई आणि वडील दोघेही कामावर गेले होते. टॉवेल आणि दोरीने तिने झोका बांधला होता. झोक्यावरून तिचा अचानक तोल गेला आणि त्याचा फास तिला बसला. तिच्या आजीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. त्यांनी फास सोडवला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर