September 10, 2024

पुणे: कोरेगाव पार्कमधील हाॅटेलमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीवर्धकाचा वापर- गुन्हे शाखेची कारवाई; ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त

पुणे, ०४/०३/२०२३: काेरेगाव पार्क भागात मोठ्या आवाजात ध्वनीवर्धकाचा वापर करणाऱ्या एका हाॅटेलवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन लाख रुपयांची ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त केली.

काेरेगाव पार्क भागातील येफिनगुट ब्रुअरीज अँड बार या हाॅटेलमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीवर्धक सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने तीन लाख दहा रुपये किंमतीची ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी हाॅटेल मालक आणि व्यवस्थापकाच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे यांनी ही कारवाई केली.