September 10, 2024

चेतक एफसी, आर्यन एफसी, दुर्गा एसएची आगेकूच

पुणे: पुणे, 04 मार्च 2023 – चेतक एफसी, आर्यन्स एफसी यांनी संघर्षुपूर्ण, तर दुर्गा एसए संघाने सोपा विजय मिळवत शनिवारी सुरु झालेल्या आमदार करंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून माया सेवा संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले असून, सामने शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर सुरु आहेत.

पाच गोल झालेल्या सामन्यात चेतक एफसी संघाने डिएगो ज्युनियर्सचे आव्हान ३-२ असे मोडून काढले. शुभम महापदीने २४व्या मिनिटाला डिएगो ज्युनियर्सचे खाते उघडले. त्यानंतर वीस मिनिटात प्रमोद अत्रे (३२वे मिनिट), अंकित देवी (४२वे मिनिट) आणि तन्मय कोलते (५२ मिनिट) यांनी तीन गोल करून चेतकला आघाडीवर नेले. त्यानंतरही डिएगो संघाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना केवळ एक गोल परतवता आला. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत ६३व्या मिनिटाला अॅशले व्हिन्सेन्टने हा गोल केला.

दुसऱ्या सामन्यात आर्यन्स एपसीने सनी डेज एफसीचा २-१ अशा फरकाने पराभव केला. आर्यन्ससाठी नईम सय्यदने दोन, तर सनी डेजसाठी सुजित जाधवने गोल केला.

आणखी एका सामन्यात निरज मानेने केलेल्या दोन गोलच्या जोरावर दुर्गा एसए संघाने एनवायएफए संघाचा ६-१ असा दणदणीत पराभव केला.

निकाल –

ग्रीनबॉक्स चेतक एफसी ३ (प्रमोद अत्रे ३२वे, अंकित देवी ४२वे, तन्मय कोलतो ५२वे मिनिट) वि.वि. डिएगो ज्युनियर्स २ (शुभम महापदी २४वे, अॅशले व्हिन्सेंट ६३वे मिनिट)

कमांडोज ए पुढे चाल वि. एबीसी एफसी

दुर्गा एस.ए. ६ (नीरज माने ४थे, ४४वे मिनिट, रुनी चिन्नादुराई १५वे मिनिट (स्वयं गोल), मयूर वाघिरे १४वे मिनिट, गोपाल बंदराज ४२वे मिनिट, प्रबोध भोसले ५७वे मिनिट) वि.वि. एनवायएफए १ (रुनी चिन्नादुराई ५४वे मिनिट)

आर्यन्स एससी अ २ (नईम सय्यद २६, ५३ वे मिनिट) वि.वि. सनी डेज एफसी १ (सुजित जाधव ७वे मिनिट)