पुणे, ०५/०५/२०२३: सालाबादप्रमाणे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आदरणीय भिक्खू संघाच्या वतीने महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अनेक बौद्ध उपासक, उपासिका, सर्व बौद्ध धार्मिक संघटना, सामाजिक व राजकीय संघटना तसेच सर्व लेणी संवर्धक यांच्या वतीने सहकार्य व सहभाग घेतला कार्ला बुद्ध लेणी येथे भंते नागघोष महाथेरो, भंते हर्षवर्धन शाक्य, भंते धम्मानंद , व भंते धर्मप्रकाश व 30 श्रामनेर यांचा संघ उपस्थित होते.
कार्ला लेणी येथील मैदानामध्ये आदरणीय भिक्खू संघाच्या वतीने त्रिसरण ,पंचशील ,बुद्ध वंदना, महामंगल सुत्त व आशीर्वाद गाथांचे सामूहिक पठण करण्यात आले व भंते नागघोश यांच्याद्वारे धम्मदेसना देण्यात आली व भगवान बुद्धांनी दिलेल्या विश्वशांतीचा व करुणेचा संदेश देण्यात आला.
बुद्ध वंदनेसाठी सुमारे पाच हजार बौद्ध उपासक व उपासिका यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी लेणीच्या पायथ्याशी वेहेरगाव येथील स्थानिक सम्राट अशोक तरुण मंडळ तसेच कान्हे मावळ विहार व विर – मुंबई यांच्या वतीने उपस्थितांना पाणी वाटप करण्यात आले.
तसेच संपर्क बालग्राम व बुद्धिस्ट बिजनेस कम्युनिटी यांच्यातर्फे रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली होती. महाबुद्धवंदना कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा व सर्व लेणी संवर्धक,सर्व धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी