July 24, 2024

पुणे: वाघोलीत मंडप व्यावसायिकाच्या गोदामात आग, तीन कमग्रारांचा मृत्यू

पुणे, ०६/०५/२०२३: वाघोलीतील उबाळे नगर परिसरात शुभ सजावट मंडप केंद्राच्या गोदामात मध्यरात्री आग लागली.गोदामात ४ ते ५ सिलिंडरचे स्फोट झाले. लग्न समारंभात वापरण्यात येणारे सजावट साहित्य, गालिचे जळाले. आगीत तीन कामगारांचां मृत्यू झाला.

 

गोदामात रंगकाम सुरू असल्यामुळे आग भडकली. गोदामातून तीन रिक्षा अग्नीशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्या. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. गोदामच्या पाठीमागे असलेल्या इंडेन गॅसचे गोदाम आहे. आग पसरू नये महणून काळजी घेण्यात आली. तेथेच असलेल्या रहिवाशी इमारतींना आगीची झळ पोहोचू नये याची दक्षता घेत रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले. पीएमआरडीए अग्निशामक दल आणि पुणे महापालिका मिळून ९ गाड्या, ४५ अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली.

 

गोदामात काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग नियंत्रणात आणली.