May 19, 2024

पुणे: कारागृहातील शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील मुले,नात-नातू व भाऊ -बहीण यांना समक्ष गळा भेट

पुणे, २१/०४/२०२३: कारागृहातील शिक्षा बंद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंद्यांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने शिक्षाबंदी आणि त्यांची १६ वर्षाखालील मुले यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक आहे,जेणेकरून समक्ष भेटीत बंदी व त्यांची मुले यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याने शिक्षणाबाबत व घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकेल ,यास्तव कारागृहात शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील सोळा वर्षाखालील मुलांची समक्ष भेट देण्यात येत होती.

या कार्यालयाकडून सूचना पत्र व परिपत्रक निर्गमित करून कार्यवाही केली जात होती.

कारागृहातील बंद्यांचे नैराश्य कमी होण्याकरिता व कौटुंबिक परिस्थितीबाबत जाणीव होण्याच्या दृष्टीने तसेच बंदी व नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद सुलभ व्हावा त्यांच्या समक्ष भेटी सुलभ व्हाव्यात व कारागृह विभागाचे ” सुधारणा व पुनर्वसन ” या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होणेच्या दृष्टीने कारागृहातील बंद्यांच्या कारागृहाबाहेरील असलेल्या मुले,नातू-नातू व भाऊ-बहीण यांना प्रत्यक्ष समक्ष भेटी देण्याबाबत नव्याने समावेश करण्यात येत आहे. यामुळे बंद्यांच्या नात-नातू यांच्या शिक्षणाबाबत व कौटुंबिक अडचणी सोडवण्यास मदत होईल.

मुले,नात -नातू ,भाऊ-बहीण यांची समक्ष भेट,तसेच रक्ताच्या नातेवाईकांचा होणारा मायाळू स्पर्श होऊन बंद्यास जगण्याची नवी उमेद निर्माण होईल व नात -नातू ,भाऊ-बहीण ,मुले यांनाही बंद्यांविषयी कृतज्ञता वाटून नवीन ऊर्जा मिळून कारागृह प्रशासनाविषयी आपुलकीची भावना वाढीस लागेल.याबाबत कार्यवाहीकरिता राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.त्यामुळे कारागृहातील बंदी व नातेवाईक यांचेमध्ये निश्चितच समाधानाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण होईल.