May 19, 2024

‘वीरबाईक’ सादर करून ऊडचलो ने इलेक्ट्रिक सायकलींसाठी प्रस्थापित केला एक नवीन मापदंड

पुणे, २१ एप्रिल २०२३: अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी ऊडचलोने ‘वीरबाईक’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण  इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. सशस्त्र दलांमुळे प्रेरित झालेल्या सर्व भारतीयांसाठी शाश्वत आणि परवडणारे वाहतुकीचे पर्याय सादर करण्यासाठी कंपनीने हे पर्यावरण पूरक वाहन सादर केले आहे. “वीर” हे नाव भौतिकशास्त्रातील ओहमचा नियम V=IR वरून प्रेरित आहे. इलेक्ट्रिकल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध यातून सूचित होतो. तसेच आपल्या सैनिकांसारखा जो धाडसी आणि शूर असतो अशा माणसाला ‘वीर’ असे म्हणतात.

ई-बाईक बद्दल बोलताना वीरबाईकचे सह-संस्थापक आणि संशोधन विकास प्रमुख श्री. साहिल उत्तेकर म्हणाले, ‘वीरबाईक’ ही एक उच्च-कार्यक्षमता असलेली इलेक्ट्रिक सायकल असून आरामदायी आणि सुलभ राइड पुरविण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही बाईक केवळ पर्यावरण पूरक आहे असे नाही तर कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठीही डिझाइन केलेली आहे. ती आयपी रेटेड ६५ आणि ६७ आहे. टिकाऊ हलक्या वजनाच्या चौकटीसह, इलेक्ट्रिक कट ऑफसह असलेले डिस्क ब्रेक आणि अॅडजस्ट करता येण्याजोग्या सीट आहे. ‘वीरबाईक’ वजनाने देखील हलकी आहे आणि त्यामुळे ती रोजच्या वापरासाठी एक आदर्श पर्याय आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने या सायकलच्या भारतात सर्व भागांचे उत्पादन भारतात करण्यात आले आहे.

टिकाऊ असण्यासोबतच वीरबाइक खिशालाही परवडणारी आहे. वाहतूकीचा हा परवडणारा पर्याय असून त्याचा कमी देखभाल खर्च हे बजेटचा विचार करून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. ही ई-बाईक सैनिकाला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १५ लाखांपर्यंत बचत करण्यास सक्षम करेल. शिवाय याला इतर कोणत्याही वाहनाप्रमाणे नंबर प्लेटची आवश्यकता नाही. सैनिकांच्या सतत होणाऱ्या बदलांमुळे त्यांना जो आरटीओचा प्रश्न भेडसावत असतो त्याचा त्रासही यामुळे होणार

नाही. पर्यावरणाचे रक्षण करत स्वतःचे वेगळेपण दाखवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आकर्षक आणि स्टाइलिश डिझाइनसह ही सायकल ही एक आदर्श निवड आहे प्रत्येक ई-बाईक दर वर्षी  २४० किलोग्राम कार्बनडाय ऑक्साइड कमी करू शकते. वेबसाइटवर उपलब्ध सोप्या आर्थिक पर्यायातून ग्राहक आता वीरबाईक घेऊ शकतात.

सादरीकरणाबद्दल बोलताना ऊडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “वीरबाईक ही एक अभिमानास्पद नवकल्पना असून ती पूर्णपणे भारतात संकल्पित आणि विकसित केली गेली आहे. यातून स्वदेशी संशोधन आणि विकासासाठी असलेली आमची बांधिलकी दिसून येते. आमचे ध्येय आमच्या ग्राहकांना शाश्वत, परवडणारे आणि टिकाऊ वाहतुकीचे पर्याय प्रदान करणे हे नेहमीच राहिले आहे आणि ‘वीरबाईक’ हे त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या सैनिकांचे जीवन अधिक आरामदायी बनवणे हे  ऊडचलोचे ध्येय आहे आणि ‘वीरबाईक’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. ‘वीरबाईक’ पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यात विशेष ऑलिव्ह ग्रीन एडिशनचा समावेश आहे, जो केवळ सशस्त्र दलांना त्यांचे शौर्य आणि त्याग यासाठीचा सलाम म्हणून उपलब्ध आहे.”

वीरबाईक virbike.com वर खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि कंपनी ग्राहकांना आकर्षक लॉन्च ऑफर सादर करत आहे. सायकल एक वर्षाच्या वॉरंटीसह मिळत असून ग्राहकांना त्रासमुक्त अनुभव मिळावा यासाठी ऊडचलो कडे देशभरात सेवा केंद्रांचे विस्तृत जाळे आहे.

वीरबाईक सादर करून ऊडचलो ने ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्याची आपली बांधिलकी  पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. कंपनीने आधीच स्वतःला ग्राहक क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून स्थापित केले आहे आणि वीरबाईकच्या सादरीकरणातून इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही ते आपला  ठसा उमटवणार आहेत.