पुणे, २२ मे २०२४: झाडाच्या फांद्या वाढल्याने त्या तोडण्यासाठी एक माणूस झाडावर गेला चढताना तो सहज चढला मात्र उतरताना त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली त्याला काही करता खाली देता येईना झाडावर अडकल्याने तो प्रचंड घाबरलेला होता याची माहिती महापालिकेच्या अग्निशामक विभागाला मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला दोरी बांधून हळुवार खाली उतरवले आणि त्याची सुटका केली.
वानवडी भागातील रामा पवार नावाचा 28 वर्षाचा तरुण झाडे तोडण्यासाठी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास झाडावर चढलेला होता. तो झाडावर अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाकडून कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन तसेच मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन आणि उंच शिडीचे ब्रॉन्टो वाहन अशी एकुण तीन वाहने रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, उंच झाडावर सुमारे तीस ते पस्तीस फुट उंचीवर रामा पवार अडकलेला होता. तातडीने झाडाच्या येथे शिडी लावून जवान झाडावर चढत त्याठिकाणी पोहोचले. तेथे हा तरूण घाबरला असल्याचे जाणवले. जवानांनी “आम्ही आलो आहोत, तुम्ही काळजी करु नका” असे सांगत धीर दिला. आजुबाजूला असणाऱ्या फांद्या “ट्रि प्रुनर” या उपकरणाने छाटून त्याच्या जवळ जाऊन रश्शीचा उपयोग करत सुमारे पंधरा मिनिटात त्याला सुखरुप खाली उतरविले. रामा पवार याला किरकोळ स्वरूपात जखमी असल्याने व ते घाबरलेल्या परिस्थितीत असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले.
अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे व तांडेल राहुल बांदल आणि वाहनचालक राहुल जाधव, चिमेंद्र पवार तसेच फायरमन किशोर कारभार, प्रसाद शिंदे, रामराज बागल, संतोष माने, सागर शिर्के, तेजस पटेल, प्रथमेश सागवेकर, वैभव बकरे यांनी या मदतकार्यात सहभाग घेतला.

More Stories
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील