पुणे, दि. ६/०७/२०२३: शहरातील वारजे माळवाडी आणि कर्वेनगर परिसरातील वाहन तोडफोड करणार्या सराईत पपुल्या उर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही ३३ वी कारवाई आहे. त्यामुळे सराईत टोळक्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
पप्पुल्या ऊर्फ दिग्वीजय तुकाराम वाघमारे वय-१९ रा. बराटे चाळ,, दत्तनगर, रामनगर, वारजे माळवाडा ( टोळी प्रमुख) देवीदास बसवराज कोळी रा. कर्वेनगर, भगवान धाकलूत, वय २० रा. लेन श्रमिक वसाहत, कर्वेनगर लिंग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे वय-२०, रा. वडारवस्ती,कर्वेनगर, मुन्ना नदाफ, रा. रामनगर, वारजे, सागर जमादार, रा. वडार वस्ती, कर्वेनगर अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
पप्पुल्या ऊर्फ दिग्वीजयने वारजे माळवाडी परिसरात टोळी बनवून वाहनांची तोडफोड करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे,धमकी देणे,बेकायदेशिर अग्नी शस्त्र जवळ बाळगणे, शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, शासकिय कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना सादर केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, एसीपी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, तत्कालीन उपनिरीक्षक यशवंत पडवळे, पोलीस अंमलदार गोणते, सचिन कुदळे, अमोल भिसे, अतुल भिंगारदिवे,विजय खिलारी,नितीन कातुर्डे यांनी केली.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन