April 22, 2024

पुणे: वारजे माळवाडीत घरफोडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

पुणे, दि. ६/०७/२०२३: बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ४० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ४० हजारांचा ऐवज चोरुन नेला . ही घटना ३ ते ४ जुलैदरम्यान वारजे माळवाडीतील सहयोगनगरमध्ये घडली.

याप्रकरणी रामचंद्र कटरे वय ३६, रा. सहयोगनगर, वारजे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र हे कुटूंबियासह सहयोगनगरमध्ये राहायला आहेत. ३ ते ४ जुलै कालावधीत ते कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ४० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. गावाहून आल्यानंतर रामचंद्र यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत