पुणे, दि. २४/०८/२०२३: पर्वती परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या सराईत संकेत लोंढेसह त्याच्या साथीदाराविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.टोळीने बेकायदेशीर मार्गाने फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी दहशत निर्माण केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेली ही ५३ वी मोक्का कारवाई आहे. त्यामुळे सराईत टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संकेत देविदास लोंढे, वय २० रा.गल्ली नं.१३, जनता वसाहत, पर्वती पायथा ( टोळी प्रमुख) प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, वय २० रा. चुनाभट्टी, सिंहगड रोड, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे वय २० रा. जनता वसाहत, शुभम दिगंबर गजधने वय १९ रा. दांडेकर पुल अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत संकेत लोंढ याच्याविरुध्द ६ गुन्हे दाखल असुन, त्याने साथीदार प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभम दिगंबर गजधने यांच्यासह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली होती. टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, हमला करण्याची पुर्वतयारी, अतिक्रमण, बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत,बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशारितीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पर्वती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना सादर केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, एसीपी अप्पासाहेब शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही