May 20, 2024

पुणे: डेक्कन कॉलेजमध्ये राष्ट्रिय संस्कृत दिनाचे आयोजन

पुणे, ०४/०९/२०२३: डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठाच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या वतीने यावर्षीचा राष्ट्रिय संस्कृत दिन, बुधवारी ६ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करण्याचे योजिले असून या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

याप्रसंगी संस्कृत लघुचलच्चित्रफित स्पर्धेमध्ये संस्कृतभारती पारितोषिकप्राप्त निवडक चित्रफितींचे प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन कॉलेजचे कुलगुरू माननीय प्रा. प्रमोद पांडे भूषविणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती नीलिमा पटवर्धन उपस्थित रहाणार असून ‘संस्कृत आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. या प्रसंगी विभागप्रमुख आणि डेक्कन कॉलेजचे प्रकुलगुरू प्रा. प्रसाद जोशी आणि सर्व शिक्षक, तसेच विभागातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सदर कार्यक्रम पदवीप्रदान सभागृह, प्राचीन भारतीय व पुरातत्त्व विभाग,डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था,अभिमत विद्यापीठ, येरवडा, पुणे, येथे स. ११.३० ते दु. १.०० यावेळ संपन्न हेणार आहे. हा कार्यक्रम् सर्व संस्कृत प्रेमींसाठी खुला आहे. अशी माहिती कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.वृषाली भोसले, सहाय्यक प्राध्यापक, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, यांनी दिली आहे.