पुणे, दि. ६/०९/२०२३: गप्पा मारत असताना सुरु असलेल्या चेष्टा मस्करीचा राग आल्याने मित्राच्या चुलत्याकडून तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीररित्या जखमी करण्यात आले. ही घटना ५ सप्टेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास मार्वेâटयार्डातील संदेशनगरमध्ये घडली आहे.
गणेश वाघमारे (वय १८), योगिराज वाघमारे (वय ४०), धनराज वाघमारे (वय ५०, सर्व रा. भिमाले कॉम्पलेक्स, मार्केटयार्ड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत सोमनाथ शिंदे (वय २५, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र ५ सप्टेंबरला सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये मस्करी सुरू असल्यामुळे गणेशला राग आला. त्याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपी गणेश, योगीराज, धनराजने मिळून हनुमंतच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. योगीराज वाघमारे याने बांबुने तर धनराज वाघमारे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही