पुणे, १९/०५/२०२३: श्वानाच्या पिलाला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी एकाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राणिमित्र संस्थेच्या कार्यकर्त्या महिलेने श्वान मारहाणीची ध्वनिचित्रफीत पाहिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली.
जुनैद शेख (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत मिशन पाॅसिबल या संस्थेच्या पद्मिनी पीटर स्टंप (वय ६५, रा. गुरुनानकनगर, शंकरशेठ रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख यांनी त्याच्या घरातील गॅलरीत चार महिन्यांच्या सायबेरियन हस्की जातीच्या श्वानाला चप्पल, तसेच लाथेने मारहाण केल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. मिशन पाॅसिबल या प्राणिमित्र संस्थेच्या पद्मिनी स्टंप यांनी ती पाहिली. त्यात शेख त्यांच्या पाळीव श्वानाला मारहाण करत असल्याचे दिसून आल्यानंतर स्टंप यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे तपास करत आहेत.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान