पुणे, ३०/०९/२०२३: तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ? आणि मनात स्मार्टफोन/मोबाईल वापराची भीती आहे? नातवंड किंवा मुलांना तुम्हाला मोबाईल शिकवण्यासाठी वेळ नाही? आजच्या डिजिटल युगात मोबाइल शिकण्यासाठी, हाताळण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधण्याची, वेब ब्राउझ करण्याची किंवा नवीन इंटरनेट एक्सप्लोर करण्याची अद्भुत संधी सोडू नका ! ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण वर्ग सिम्बायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, सेनापती बापट रोड, पुणे यांच्या मार्फत आयोजित केला आहे. मोबाइलचा दैनंदिन जीवनातील वापरासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणे हाच या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रकारे मोबाईल फोन कळेल अशा सोप्या प्रादेशिक भाषेत,अनुभवी प्रशिक्षक प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन करतील अशी या प्रशिक्षण वर्गाची रचना करण्यात आली आहे. प्रशिक्षण वर्ग म्हणजे डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून जेष्ठांना स्मार्ट फोनचा वापर, सामान्य फसवणूकीपासून सावधगिरी, तसेच ओटीपी, पासवर्डची सुरक्षितता, व्हिडिओ रेकॉडिंग, फोटो काढणे, पीडीफ फाईल बनवणे,ऑनलाईन पेमेंट अँपचा वापर, गॅस/कॅब बुकिंग, वीजबिल भरणे, बस व विमान तिकिट/पुणे मेट्रो तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग अँप शिकवले जाते.
प्रशिक्षणाचे स्थळ:- सिम्बायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६.
अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२०२५९२५३७८ / ९६२३९५६८७४/९८६०१४८०११/ ९३७०३९०९२८
More Stories
ऑटोमायजेशनमुळे भाषेचे सौंदर्य आटले; डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे प्रतिपादन
महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन