पुणे, ४/५/२०२३: आजच्या धावपळीच्या जगात नातवंड,मुले यांना आजी-आजोबांना मोबाइल हाताळण्यातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवायलाही वेळ उरलेला नाही. त्यामुळे या डिजिटल जगापासून ते वंचित राहत आहेत. मोबाइल दैनंदिन जीवनात कसा उपयुक्त ठरू शकेल यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणे हाच या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रकारे मोबाइल फोन कळेल अशा सोप्या प्रादेशिक भाषेत उच्च शिक्षित प्रशिक्षकांकडून हे तंत्र शिकवणे अशी या प्रशिक्षणवर्गाची रचना करण्यात आली आहे.
हा प्रशिक्षण वर्ग म्हणजे डिजिटल इंडियाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून जेष्ठांना स्मार्ट फोनचा वापर, सामान्य फसवणूकीपासून सावधगिरी बाळगणे, तसेच ओटीपी, पासवर्डची सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक माहिती देणे, व्हिडिओ रेकॉडिंग, फोटो काढणे, पीडीफ फाईल बनवणे, विविध ऑनलाईन पेमेंट अँपचा वापर, गॅस बुकिंग, कॅब बुकिंग, वीजबिल भरणे, बस व विमान तिकिट, हॉटेल बुकिंग अँप शिकवले जाते. यामुळे डिजिटल जगात नव्याने प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत मिळेल. यासाठी सिम्बायोसिस संस्थेचे परिसरातील लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. येताना घरच्यांच्या मदतीने बुक केलेल्या टॅक्सीने आलेली ही मंडळी जाताना मात्र स्वतः टॅक्सी बुक करून आत्मविश्वासाने घरी जातात हीच या प्रशिक्षण वर्गाची खासियत आहे. प्रादेशिक भाषेत (मराठी) वर्ग आयोजित केले जातील, जास्तीत जास्त प्रभावासाठी ऑडिओ/व्हिडिओ, सादरीकरण आणि थेट प्रात्यक्षिके घेण्यात येतील. नावनोंदणी व प्रशिक्षणा संबंधी माहिती मिळवण्यासाठी सकाळी १०. ०० ते संध्याकाळी ५ . ०० या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
प्रशिक्षणाचे ठिकाण:- सिम्बायोसिस सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६
अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२०२५९२५३७८ / ९६२३९५६८७४
More Stories
पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टफोन आणि संगणक प्रशिक्षण
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना डांबले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘दगडूशेठ’ गणपतीची सांगता मिरवणूक दुपारी ४ वाजता मार्गस्थ