पुणे, दि. ०४/०५/२०२३: पुणे रेल्वे स्टेशन परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला अडवून रिक्षात बसवित टोळक्याने रॉडने मारहाण केली. त्यानंतर मोबाइलमधील बँकअॅपचा पीनकोड विचारुन ७१० रुपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेत जबरी चोरी केल्याची घटना २ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
किरण धनराज खरात (वय २८ रा. ताडीवाला रोड) आणि आफताब अयुब शेख (वय २२, रा. लुंबिनीनगर, बंडगार्डन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी संदेश अवताडे (वय १८, रा. शिवाजीनगर) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश आणि मित्र २ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी तिघाजणांनी संदेशला बोलावून घेत रॉडने मारहाण केली. त्याच्या मोबाइमधील बँकअॅपद्वारे ७१० रुपये चोरट्यांनी वर्ग करुन घेत फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करीत आहेत.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी