April 22, 2024

पुणे: वाहतूक कोंडी सोडवा,अन्यथा ….मुंढवा – केशवनगरवासीयांचा महापालिका प्रशासनाला इशारा

मुंढवा, २५/०६/२०२३: वर्षानुवर्षांच्या वाहतूक कोंडीमुळे मुंढवा केशवनगरवासियांचे जगणे असह्य,झाले असून आता आमची सहनशीलता संपली आहे,मुंढवा चौकात भूयारी मार्ग अथवा उड्डाणपूल करा,बाधित नागरिकांना भरपाई देऊन रस्ते रुंद करा नाहीतर मनपा आयुक्तालयात हजारो नागरिकांना घेऊन घुसू असा खणखणीत इशारा जनसेवक संदीप दादा लोणकर यांनी महात्मा फुले चौक मुंढवा येथे बोलताना दिला.

Pune: Solve the traffic jam, otherwise....Mundhwa - Keshavnagar residents warn the municipal administration

महात्मा फुले चौक मुंढवा येथे रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतुन सुटका होण्यासाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल व्हावा यासाठी,केशवनगरमधील रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे अनेक चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी,मुंढवा-केशवनगरमधील रस्ता रुंदीकरणात बाधित नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळण्याकरिता केशवनगरचे माजी उपसरपंच,भाजपा नेते संदीपदादा लोणकर यांनी भव्य जनआक्रोश रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन महात्मा फुले चौक मुंढवा येथे आज केले.

 

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर,भाजपा अध्यक्ष संदीप दळवी,महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे,भाजप नेते गणेश घुले,प्रशांत भंडारी,कुलदीप कोद्रे,अशोक येवले,देवीदास लोणकर,साहेबराव लोणकर,कर्नल सक्सेना,ओंकान्त बोने,सतीश शिरवळे,आरपीआय अध्यक्ष महादेव दंदि,अनिल आबनावें,सागर भंडारी,संतोष माने,नंदकुमार लोणकर,प्रदीप पाटील,सोमलिंग जतकरविविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि मुंढवा केशवनगर परिसरातील शेकडो नागरिक,महिला,युवक यांनी आंदोलनामध्ये आपला सह्भाग नोंदवत पुणे मनपाचा जोरदार घोषणा देत निषेध केला.

 

पाच वर्ष आमदार म्हणून मुंढवा केशवनगरसाठी मी काय काम केले हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे,महात्मा फुले चौक मुंढवा येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल व्हावा यासाठी,मुंढवा-केशवनगरमधील रस्ता रुंदीकरणात बाधित नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळून रुंदीकरणाची काम तातडीने सुरु करण्याबाबत मनपा आयुक्त यांच्याबरोबर तातडीने बैठक घेणार आहे,याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.

 

नगरसेवक,महापौर,उपमहापौर,आमदार,खासदार यांना आम्ही मतदान करून निवडून आणले पण त्यांना वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही असे इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी आमच्या वाट्याला आले पण सत्ता नसताना पदरमोड करून जनसेवक संदीप लोणकर यांनी भव्य जन आक्रोश आंदोलन उभारले आहे,आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलताना व्यक्त केला. मुसळधार पावसाची फिकीर न करता आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणा देत मुंढवा चौक दणाणून टाकला.

 

पुणे मनपा रस्ते विभाग अभियंता श्री ननावरे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले तर आंदोलनप्रसंगी मुंढवा पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.