पुणे, दि. ३१/०७/२०२३: शहरातील विविध भागातून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाईलसह इतर गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला आहे. आकाश रामलिंग ओव्हाळ वय- २८ रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर आणि . सुहान मुनावर खान वय- १८ रामनगर, रामटेकडी, हडपसर अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
फिर्यादी रिंकु सियाराम कुमार यांच्या ज्युपिटर क्लासिक मोपेड गाडीच्या डिकीकेमध्ये मोबाईल हँडसेट, वस्तु व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपींच्या लोकेशनवर तपास पथकातील अमलदार गायकवाड व भोसले यांना पाठवुन एकाला ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक तपास करुन त्याचा आणखीन एक साथीदार यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून स्मार्ट मोबाईल, फायर बोटचे स्मार्ट वॉच व १६ जीबीचा पेनड्राईव्ह असा मुद्देमाल जप्त केला.
अधिक तपासात आणखिन १४ स्मार्ट मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळुन आलेल्या १४ स्मार्ट मोबाईल हँडसेट बाबत पुढील तपास चालु आहे.
ही कामगीरी. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विक्रात देशमुख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक विनय पाटणकर पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, संतोष नाईक, हरिदास कदम, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, यतिन भोसले, विठ्ठल चोरमले, राहुल माने, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, यांनी केली आहे.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही