February 9, 2025

पुणे: सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर्स एफसी, सीएमएस फाल्कन्स अ व ब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 26 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर्स एफसी, सीएमएस फाल्कन्स अ व ब या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आनंद विनोद(56मि) याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर सीएमएस फाल्कन्स ब संघाने स्वराज एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात स्ट्रायकर्स एफसी संघानेअमर एफसी संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. स्ट्रायकर्स एफसीकडून सुबोध लामा(4, 6मि.,) याने दोन गोल तर अमित रावत(50मि.) ने एक गोल केला. अमर एफसीकडून वरुण लाड(30मि). गौरव स्वामी नाथन(35मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
चुरशीच्या लढतीत सीएमएस फाल्कन्स अ संघाने जीएक्स वॉरियर्स संघाचा 4-3 असा पराभव करून आगेकूच केली. निर्धारित वेळेत सामना गोल शुन्यबरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. विजयी संघाकडून अनुप नायर, मनिष ठाकरे, केविन घाटगे, जोयल लालरेमरुता यांनी गोल केले. तर, पराभुत संघाकडून साहिल रोकडे, विवेक नाथ, फहीद खान यांना गोल मारण्यात अपयश आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
सीएमएस फाल्कन्स ब: 1(आनंद विनोद 56मि.) वि.वि.स्वराज एफसी: 0;
स्ट्रायकर्स एफसी: 3 (सुबोध लामा 4, 6मि., अमित रावत 50मि.) वि.वि.अमर एफसी: 2 (वरुण लाड 30मि. गौरव स्वामी नाथन 35मि.);
सीएमएस फाल्कन्स अ: 4(अनुप नायर, मनिष ठाकरे, केविन घाटगे, जोयल लालरेमरुता)(गोल चुकविला:साहिल भोकरे, अश्ले दास) टायब्रेकरमध्ये वि.वि.जीएक्स वॉरियर्स: 3(जबिर पटेल, देंझील त्राविस, स्वप्निल शिंदे (गोल चुकविला:- साहिल रोकडे, विवेक नाथ, फहीद खान); पुर्ण वेळ: 0-0;
40 वर्षांवरील गट: पुणे प्रौढ संघ: 2(मायकल डिक्रुझ 16मि., श्रीनिवासन पिल्ले 18मि.) वि. वि. खडकी मास्टर्स: 0.