पुणे, १५/०७/ २०२३: अष्टविनायक फर्म या गृहप्रकल्पात पैसे गुंतवल्यानंतर कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने एका इसमाने पुण्यातील खराडी परिसरात एका सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. प्रभात शुभ शंभू प्रसाद रंजन (वय- 46 ,राहणार- विठ्ठलनगर, खराडी, पुणे )असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चार आरोपींवर चंदननगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिलेली आहे.
याप्रकरणी मताचा भाऊ राजीव शंभू प्रसाद रंजन (वय -48 ,राहणार -झारखंड )यांनी आरोपी अष्टविनायक फर्मचे मालक सेलवा नडार, प्रसाद शिंदे ,सचिन कुमार जगदेव आणि अजिंक्य लोखंडे या आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 13 जुलै रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील ईग यांग सोसायटी याठिकाणी घडलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाऊ प्रभात रंजन यास संबंधित आरोपी यांनी त्यांच्या अष्टविनायक फर्म या फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्याचप्रमाणे आरोपी अजिंक्य लोखंडे यांनी प्रभात रंजन यांची मर्सिडीज गाडी( एम एच 11 वी 15 67 )ही साडेसात लाख रुपयाला खरेदी करून तिचे साडेचार लाख रुपये न देता, संबंधित चार आरोपींनी मिळून तब्बल एक कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
त्याचप्रमाणे सध्या कोणताही जॉब नसल्याच्या नैराश्यातून ,प्रभात रंजन यांनी राहते घरात पत्नी आणि दोन मुले झोपले असताना, इमारतीच्या अकराव्या मजल्यावर जाऊन टेरेस वरून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. चंदननगर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी ,घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठवला. त्याचप्रमाणे पोलिसांना मयताच्या घरात विषाची बाटली ही मिळून आलेली आहे. त्यामुळे पाहिले विष पिऊन त्यानंतर आत्महत्या केली आहे का? याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस खांडेकर हे करत आहे.
More Stories
पुणे: आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात…विद्यार्थ्यांचे औक्षण करून,साखर वाटून स्वागत
पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….