पुणे, १५/०७/२०२३: कोंढव्यातील साळुंके विहार रस्त्यावरील एमएनजीएलच्या वाहिनीतून गॅसगळती होऊन आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. गॅसगळतीमुळे साळुंके विहार परिसरातील गॅस पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता. आगीची झळ रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या एका मोटारीला बसल्याने मोटारीचे नुकसान झाले.
साळुंके विहार रस्ता परिसरात एमएनजीएलकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. या भागात गॅसपुरवठा करणाऱ्या वाहिनीतून गॅसगळती सुरू झाली. गॅसगळतीमुळे वाहिनीने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. कोंढवा अग्निशमन दल केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. एमएनजीएलच्या तंत्रज्ञानी घटनास्थळी भेट देऊन गॅसपुरवठा बंद केला.
गॅसवाहिनीची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीनंतर या भागातील गॅसपुरवठा सुरळीत झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
More Stories
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत
औरंगजेबाची कबर हटवयन्याची विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी ः अनयथा राज्यव्यापी ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलनचा इशारा