November 2, 2024

पुणे: विश्रांतवाडीत शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, १५/०५/२०२३: विश्रांतवाडीतील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात एका विद्याथ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

विजय नांगरे (वय २१,रा. मोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने वसतीगृहाच्या अभ्यासिकेत पंख्याला गळफास लावून घेतल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात होता. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विजय गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळाली आहे.

या पूूर्वी त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.