पुणे, दि. २०/०९/२०२३: गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी सराफाकडील पिशवीतून ४ लाख १८ हजारांचे सोन्याचे बिस्कीट चोरुन नेले. ही घटना १९ सप्टेंबरला दुपारी बावणेबाराच्या सुमारास रविवार पेठेतील हमजेखान चौकात घडली आहे. याप्रकरणी दीनेशकुमार खंडेलवाल (वय ४६ रा. गुरूवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीनेशकुमार यांच्या भावाचे गंजपेठेत सोन्या-चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. १९ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास दीनेशकुमार हे सोन्याचे बिस्कीट घेउन पायी रविवार पेठेत जात होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून ४ लाख १८ हजारांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा शेंडगे तपास करीत आहेत.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही