July 25, 2024

पुणे: खड़की स्टेशन जवळील रेल्वे फाटक दोन दिवस बंद राहील

खड़की, १४/०३/२०२३: पुणे – लोनावळा रेल्वे मार्गावर खड़की -दापोड़ी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे किमी 184/500-600 वर असलेले रेल्वे फाटक संख्या 62AA दुरुस्तीच्या कामानिमित्त बुधवार दिनांक 15 मार्च सकाळी 08.00 वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक 16 मार्च संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वरील कालावधीत या रेल्वे फटकाजवळच असलेला भुयारी मार्ग रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.