पुणे, ०८/०४/२०२३: कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी फ्रेमबॉक्सने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनातून मिळाली.
फ्रेमबॉक्स हि एक शैक्षणिक संस्था असून मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था आहे. “वार्षिक कला प्रदर्शन” हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून यंदाचे दोन दिवसीय प्रदर्शन दि. ७ एप्रिल ते दि. ८ एप्रिल 2023 रोजी कलारसिकासाठी खुले होते.
यावर्षी “अवतार” या सिनेमावर आधारित कलाकृती हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रेमबॉक्स २.० चे संस्थापक व संचालक राजेश आर तुराखिया, YRF स्टुडिओचे VFX समन्वयक दिपल दास, या क्षेत्रातील जेष्ठ तज्ज्ञ हेमंत शिंदे यांची उपस्थिती लाभली.
वार्षिक कला प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्टच कलाकृती प्रदर्शित केल्या जातात व त्या मधून उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण वर्गकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. या प्रदर्शनात प्रदर्शित केलेल्या चित्र, शिल्प व वस्तू पाहून अनेक कलादालने अथवा व्यावसायिक कंपन्याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. त्यासाठी या प्रदर्शनाचे महत्व वेगळे आहे. या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली. त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र साकारली आहेत.
शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविल्या होत्या. तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरणारे होते. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.