पुणे, दि. ७/०८/२०२३: शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिषाने ४४ जणांना तब्बल ५ कोटींचा गंडा घालणार्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यासह भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) असे अटक केलेल्या तत्कालीन आयुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पोपट हे शिक्षक असून त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक पदावर नोकरी मिळवायची होती. त्यासाठी ते विविध ठिकाणी माहिती घेत असताना जून २०१९ मध्ये पोपट यांची भेट आरोपी दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने पोपटला आपली बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानुसार मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे सांगितले. आरोपी दादासाहेबने पोपट यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसरमध्ये २७ लाख रुपये घेतले. मात्र, काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने पोपटने आरोपीला पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे परत न देता फसवणूक केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही