May 18, 2024

पुणे: तरुणाचा मोबाइल हिसकावणार्‍या त्रिकुटाला अटक

पुणे, दि. ६/०९/२०२३: पादचारी तरूणाचा मोबाइल हिसकाविणार्‍या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे .ही घटना ४ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास ट्रम्प टॉवर रस्त्यावर घडली आहे.

दीपक चंद्रकांत मांडगे (वय २४, रा. खराडी बायपास), तुषार बाबासाहेब रसाळ (वय २५ रा. चाकण, खेड), राधाकिसन बबन साठे (वय ३०, रा. कल्याणीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोजकुमार मराठे (वय ३७, रा. चंदननगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजकुमार हे ४ सप्टेंबरला रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांचा ५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी येरवडा पोलिसांंनी तपास करुन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांच्या पथकाने केली.