February 9, 2025

पुणे: हडपसरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचार्‍याला लुटले

पुणे, दि. ०२/०७/२०२३: कामावरुन सुटल्यानंतर रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून चोरट्यांनी मोबाइल, रोकड असा साडेपाच हजारांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना ३० जूनला रात्री दहाच्या सुमारास हडपसरमधील डीपी रस्ता परिसरात घडली.

याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हडपसरमधील एका खासगी कंपनीत कामाला आहे. ३० जूनला कामावरुन सुटल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास डीपी रस्ता परिसरातून पायी जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला अडवून ४ हजारांचा मोबाइल आणि रोकड असा साडेपाच हजारांचा ऐवज हिसकावून नेला. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी तपास करीत आहेत.