पुणे, दि. ०२/०७/२०२३: भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना ३० जूनला पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीत घडली. अपघातात ठार झालेल्या पादचार्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अमलदार घनश्याम आडके यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी परिसरातून पादचारी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

More Stories
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार
Pune: फेरीवाल्यांना नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ
भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती