November 7, 2024

पुणे: जांभुळपाड्याची वंचित मुले एमआयटी-एडीटीच्या कॅम्पसमध्ये गेली हरखून

पुणे, २४/०५/२०२३: खोपोली तालुक्यातील जांभूळपाडा येथील ३५ आदिवासी मुलांनी नुकतीच एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या लोणी काळभोर येथील कॅम्पसचा दौरा केला. या वेळी कॅम्पसची भव्यता आणि येथील शैक्षणिक सुविधा पाहून मुले हरखून गेली होती. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी सौरभ भरम याने सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन केलेल्या स्माईल सोशल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता.

या उपक्रमा अंतर्गत नववी व दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्व विद्यार्थ्यांचे एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या स्टुडंट अफेयर विभागाचे सहयोगी संचालक डाॅ. सुराज भोयर यांनी केले. सेवा चॅरिटेबल
ट्रस्टचे मगेश रेड्डी, अमोल शिंगाडगाव यांनी यांनी विद्यार्थ्यांच्या या दौऱ्याची संपूर्ण व्यवस्था पाहिली.

या वेळी विद्यार्थ्यांसाठी एक परिसंवादही घेण्यात आला. एमआयटी-एडीटी विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्णा यांनी मुलांना पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगून संवादाची सुरुवात केली. त्यांनी स्वामी
विवेकानंदांच्या शहाणपणाच्या शब्दांवर जोर दिला,

क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड विद्यार्थ्यांना दैनंदिन शारीरिक हालचालींचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा पाठपुरावा कसा करावा, तसेच खेळ आणि तंदुरुस्ती यांचे महत्व पटवून दिले.

विंग कमांडर मोहन मेनन यांच्यासह डॉ. सुराज भोयर यांनी त्यांचे मौल्यवान अनुभव शेअर केले आणि भविष्यातील संभाव्य करिअर पर्यायांवर मुलांना मार्गदर्शन केले. अभिषेक गुजर यांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पसची
सफर करवली, तसेच एमआयटी-एडीटी विद्यापीठातील सुविधा व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

या वेळी विद्यापीठाचा सुंदर परिसर, जगातील सर्वांत मोठा आणि भव्य-दिव्य असा विश्व शांति डोम, राज कपूर मेमोरियल, तसेच विद्यापीठातील आकर्षक चित्र-शिल्पे, भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, मरीन इंजीनियरिंग
काॅलेजमधील विशाल पाणबुडी, विद्यापीठातील भारतीय संस्कृती दर्शवणारी ठिकाणे, सुसज्ज लायब्ररी पाहून मुले अक्षरशः हरखून गेली होती, तसेच येथून एक नवी ऊर्जा घेऊन हे सर्व विद्यार्थी परत गेले.

हा दौरा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल सेवा चॅरिटेबल व स्माईल सोशल फाउंडेशनने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले.

– वंचितांचे जीवन फुलवण्याचा `स्माईल` व `सेवा`चा प्रयत्न

स्माईल सोशल फाऊंडेशन आणि सेवा चॅरिटेबल ट्रस्ट वंचितांचे जीवन उन्नत करण्याचे ध्येय घेऊन काम करीत आहेत. हा कॅम्पस टूर उपक्रम त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एक होता. झोपडपट्ट्या आणि रस्त्यावरील किंवा काम करणार्‍या मुलांना भेडसावणार्‍या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने, ते समाजातील सर्व घटकांमध्ये हसू आणि आनंद आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे, वंचित मुले, मजूर, महिला आणि ज्येष्ठ
नागरिकांना मूलभूत गरजा आणि वाढ आणि विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

जांभुळपाडा येथील मुलांना उज्ज्वल आणि आशादायक भविष्यासाठी शुभेच्छा देत, स्माईल सोशल फाउंडेशन आणि सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अशा आणखी कार्यक्रमांचे आयोजन करण्यास वचनबद्ध आहेत जे सतत प्रेरणा, सक्षम आणि जीवनात परिवर्तन घडवून आणत असतात.