पुणे, ५ मे २०२५: सिंहगड रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे बेशिस्त नागरिकांनी यातून मार्ग काढण्यासाठी थेट उलटा प्रवास सुरू केला. कोंडी फुटण्याची वाट न पाहता डायरेक्ट गाडी उलटी फिरवून विरुद्ध दिशेने प्रवास करत पुन्हा राजाराम पुल गाठल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री समोर आलेला आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडवण्यात महापालिका पोलीस प्रशासनासह नागरिकांचा हातभार लागत आहे.
पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान च्या दरम्यान दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी झाल्यानंतर आहे त्यानंतर या उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण टाईम थिएटर येथे उड्डाणपूल संपल्यानंतर वडगाव येथील वीर बाजी पासलकर चौका पर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोंडी कमी करण्यासाठी जागा पाहणी केली पण त्यानंतर अजून प्रत्यक्षात उपायोजनांचे काम सुरू झालेल्या नाहीत. आज उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली वाहनांच्या रांगा संतोष हॉलपर्यंत आलेल्या होत्या. या कोंडीला वैतागून नागरिकांनी धोकादायक पद्धतीने यू टर्न घेऊन पुन्हा राजाराम पुलाच्या दिशेने प्रवास चालू केला. त्यामुळे विठ्ठलवाडी कमान येथेही वाहतूक कोंडीत झाली.
उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने तेथे अडकून न पडता थेट यु टर्न घेऊन विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची शक्कल बेशिस्त नागरिकांनी लढवली. त्यामुळे राजाराम पुलाकडून वेगात येणारचालक समोरून गाडी पाहून गोंधळात पडले. अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊन स्वतःच्या जीवासह इतरांचा जीव हे नागरिक घातल असल्याचे या निमित्ताने समोर आले. दरम्यान हा प्रकार घडत असताना बेशिस्त नागरिकांना रोखण्यासाठी एकही वाहतूक पोलीस तेथे उपलब्ध नव्हता.

More Stories
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी