पुणे, दि. २४/०४/२०२३: खडकीतील दारू गोळा कारखाण्यात दुचाकीवरून कामाला निघालेल्या महिलेचा दोघांनी मानेवर वार करून निघृन खून केल्याचा धक्कादायक दायक प्रकार सोमवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडला आहे.
प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रजनी राजेश बैकेल्लु (वय 44, रा. कुंदन कुशल सोसायटी, बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ईश्वर गोविंद स्वामी (52, रा. गुरव चाळ, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
खडकीतील दारूगोळा कारखाण्यात रजनी नोकरी करीत होती. पतीच्या निधनानंतर रजनी त्यांच्या जागी नोकरीस लागल्या होत्या. तेथे त्या अटेंडंट म्हणून नोकरी करत होत्या. तर त्यांना दोन मुले आहेत. सोमवारी (दि. 24) त्या नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून नोकरीस निघालेल्या असताना काराखाण्याच्या गेटच्या काही मिटर अंतरावरच दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेला रस्त्यात गाठले. तिच्या मानेवर, गळयावर तसेच शरिरावर वार केले. तिचा किंचाळी पाहून जवळ असलेली लोक तात्काळ जमा झाली. लोक आलेले पाहुन हल्लेखोरांनी देखील घटनास्थळावरून धुम ठोकली. गंभीर जखमी झालेल्या रजनी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन