पुणे, 24 एप्रिल 2023 – अस्पायर एफसीने बेटी सुरक्षा अभियान करंडक नाईन अ साईड फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहताना अखेरच्या सामन्यात अस्पायर एफसीने पूणे सॉकर क्लब संघाचा १-० असा पराभव करून ही कामगिरी केली.
चार दिवसांच्या या स्पर्धेचे आयोजन फ्री-अ गर्ल )भारत) या संस्थेने एएफए सॅमफोर्डच्या संयुक्त विद्यमाने केले होते. पूणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा डॉन बॉस्कोच्या मैदानावर पार पडली.
अखेरच्या सामन्यात अस्पायरसाठी सेजल धनवडेने एकमात्र विजयी गोल सामन्याच्या १५व्या मिनिटाला केला. स्पर्धेतील सामने ४० मिनिटांचे खेळविण्यात आले.
अस्पायरने संपूर्ण स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. अस्पायरने स्पर्धेत एकही गोल स्विकारला नाही, तर १७ गोल केले. पहिल्या सामन्यात अस्पायर एफसीने डिएगो ज्युनियर्सचा ७-० असा पराभव केला. यामध्ये सेजलच्या हॅटट्रिकचा समावेश होता. रितिका सिंगने दोन, तर तनया गायकवाडने एक गोल केला. उपांत्य फेरीत अस्पायरने वैष्णवीच्या चार, सेजलच्या तीन गोलच्या जोरावर कमांडोजचे आव्हान ९-० असे परतवून लावले. अन्य दोन गोल तनयाने केले.
अस्पायरचे हे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी अस्पायर एफसीने राईज अप २०२२ आणि कुरुक्षेत्र महिला खुली स्पर्धा २०२२-२३ जिंकली होती.
स्पर्धेत सात गोल करणाऱ्या अस्पायर एफसीच्या सेजल धनवडेला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. अस्पायरचीच अंजली बारके सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरली.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर