पुणे,दि.28 फेब्रुवारी 2023 पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी स्टार्स, पीवायसी ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत क गटात पीवायसी स्टार्स संघाने क्यू मास्टर्स चॅलेंजर्स संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून पहिला विजय नोंदवला. सामन्यात पीवायसीच्या गौरव देशमुखने क्यू मास्टर्सच्या वेदांत कोरेकरचा 13-36, 69-08, 40-04, 66-13 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात पीवायसीच्या सलील देशपांडेने सुरेख खेळ करत क्यू मास्टर्सच्या मार्मिक भन्साळीचा 51(42)-15, 62-22, 38-13 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. सलील याने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये 42 गुणांचा ब्रेक नोंदवला. तिसऱ्या सामन्यात पीवायसीच्या योगेश लोहियाने रोमा भगतचा 40-15, 59-07, 40-02 असा पराभव केला.
फ गटात चुरशीच्या लढतीत पीवायसी ईगल्स संघाने एमबीए युथ क्लब संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. पीवायसी इगल्सच्या आनंद आपटेला एमबीए युथ क्लबच्या ओम पांडेने 23-33, 42-66, 21-37 असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात पीवायसी इगल्सच्या निरव ठक्कर याने एमबीए युथ क्लबच्या लक्ष्मीकांत डीचा 43-26, 51-48, 12-29, 64-56 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत पीवायसीच्या अशोक शेट्टीने सुदर्शन शिवरामचा 29-24, 23-56, 16-41, 57-08, 31-21 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. क गटाच्या लढतीत साद सय्यद, संकेत मुथा, चिंतामणी जाधव यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने पूना क्लब स्टार्सचा 3-0 असा पराभव करून दुसरा विजय नोंदवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
गट फ: पीवायसी ईगल्स वि.वि.एमबीए युथ क्लब 2-1(आनंद आपटे पराभुत वि. ओम पांडे 23-33, 42-66, 21-37; निरव ठक्कर वि.वि.लक्ष्मीकांत डी43-26, 51-48, 12-29, 64-56; अशोक शेट्टी वि.वि.सुदर्शन शिवराम 29-24, 23-56, 16-41, 57-08, 31-21);
क गट: कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.पूना क्लब स्टार्स 3-0 (साद सय्यद वि.वि.कुमार शिंदे 40-11, 69-42, 45-04; संकेत मुथा वि.वि.माधव क्षीरसागर 46-00, 84-17, 42-13; चिंतामणी जाधव वि.वि.राजेश मरगळे 09-36, 33-47, 42-00, 08-32, 47-09);
क गट: पीवायसी स्टार्स वि.वि.क्यू मास्टर्स चॅलेंजर्स 3-0 (गौरव देशमुख वि.वि.वेदांत कोरेकर 13-36, 69-08, 40-04, 66-13; सलील देशपांडे वि.वि. मार्मिक भन्साळी 51(42)-15, 62-22, 38-13; योगेश लोहिया वि.वि.रोमा भगत 40-15, 59-07, 40-02);
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान