March 9, 2026

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

पुणे, 08/03/2026: पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

‘नवी पिढी स्वतःहून आता संभाजी महाराजांचे विचार जगण्याचे, त्यांच्या मार्गावर चालण्याचे प्रयत्न करीत असून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, विचार आणि जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविण्याचे काम सर्वांनी करावे’ असे आवाहन मुख्य विश्वस्त सुरेश नाशिककर यांनी केले.

‘सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांघिक भावनेनं धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, इतिहास आणि विचार संपूर्ण पुणे शहरात पोहचवीत अनेक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात राबवू’ असा विश्वास नूतन अध्यक्ष नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी दिला.

धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान – नवनियुक्त कार्यकारिणी:

अध्यक्ष: राघवेंद्र (बाप्पू) मानकर

कार्याध्यक्ष: नगरसेवक अपूर्वजी खाडे

मुख्य विश्वस्त: माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर

समन्वयक: संतोषजी रासकर

उपाध्यक्ष: राजाभाऊजी मदगे, प्रकाशजी कुडले, महेशजी भरगुडे, हेमंतजी कांचन, रमेशजी परदेशी.

खजिनदार: मंदारजी बलकवडे.
सहखजिनदार: सुनीलजी कुंजीर.

सचिव: कालिदासजी नाशिककर.

सहसचिव: प्रांजलजी काळे, अनिकेतजी मेणे, विश्वासजी मणेरे, नितीनजी आपटे, नरेंद्रजी पायगुडे, प्रवीणजी डोंगरे.

प्रसिद्धी प्रमुख: रोहितजी पांडे, चिंतनजी शाह, आकाशजी कामठे, अजयजी खाडे, नवनाथजी पठारे, समीरजी कोंडे, भूषणजी वरपे, श्रद्धाताई शिंदे, गणेशजी खेंगरे, अभिषेकजी अंत्रे.

महिला आघाडी: स्नेहलताई पाटोळे, अपर्णाताई कुऱ्हाडे, मनीषाताई कांबळे.