June 16, 2024

दूष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शूल्क परत करा – मानवी हक्क आयोगाचे राज्यशासनास आदेश

पुणे, २३ मे २०२४ : राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात देखील दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना, नागरिकांना सहन करावे लागत आहेत. नागरिकांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड तर्फे मानवी हक्क आयोगाकडे केलेली होती. त्याची दखल घेऊन हे शोध परत करावे असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी दिली आहे.

स्टुडंट हेल्पींग हँडस संस्थेनी मानवी हक्क आयोगाकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ झाली नाही किंवा त्यांचे साधे अर्ज प्रक्रीयाही विद्यापीठे व काॅलेजनी पुर्ण करुन घेतली नाहीत. यासंदर्भात तक्रार पूराव्यासह केली होती.

त्याची तात्काळ दखल मानवी हक्क आयोगानी घेतली.त्यानंतर १३ मे २०२४ पहीली सुनावणी आँनलाईन झाली. त्यात स्पष्ट निर्देश दिले की स्टुडंट हेल्पींग हँडसनी दिलेल्या यादी सर्व विभागाना पाठविण्यात यावी. तसेच ३० मे २०२४ तक्रारदार लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात यावे.

या प्रकरणी राज्यातील लाखो दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अवश्यक आहे. यासाठी स्टूडंट हेल्पिंग हँडसची लढाई करत आहे. शासन व प्रशासनाने परीपत्रक काढुन थांबु नये. तर त्यांची जणजागृती माध्यामात करण्यात यावी.जेणेकरुन विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, असे आंबेकर यांनी सांगितले.