June 14, 2024

19व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेद शेटे याला विजेतेपद

पुणे, 13 नोव्हेंबर 2023: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित 19व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेद शेटे याने 8गुणांसह अव्वल स्थान पटकावत विजेतेपद संपादन केले.
गणेश सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीअखेर सम्मेद शेटेने ऋचा पुजारीचा पराभव करून 8गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, लक्ष्मण आर आरने राहुल व्ही एसला पराभुत करुन दुसरा क्रमांक पटकावला. विक्रमादित्य कुलकर्णीने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या सम्मेद शेटेला करंडक व 60000रुपये, तर उपविजेत्या लक्ष्मण आर आर याला करंडक व 30000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुजनील केमोचे संचालक आशिष देसाई, ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रिडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, कुंटे चेस अकादमीच्या संचालिका मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे, दिप्ती शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, याप्रसंगी 9 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावनाऱ्या अद्विक अग्रवालचा बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.
निकाल: नववी फेरी(व्हाईट व ब्लॅक या नुसार):
सम्मेद शेटे (8गुण) वि.वि.ऋचा पुजारी (7गुण);
लक्ष्मण आर आर(8गुण) वि.वि.राहुल व्ही एस(7गुण);
विक्रमादित्य कुलकर्णी(8गुण)वि.वि.मोहम्मद शेख (6.5 गुण);
कुशाग्र, मोहन (7.5 गुण)वि.वि.ऋत्विक कृष्णन (6.5 गुण);
सुयोग वाघ (7.5 गुण)वि.वि.ओम गाडा (6.5गुण);
वेदांत नागरकट्टे (6.5गुण)पराभुत वि.निखिल दिक्षित (7.5 गुण);
कशिश जैन (7 गुण)बरोबरी वि .अक्षय बोरगावकर (7गुण);
पद्मिनी राउत(7गुण)वि.वि.मिहिर सरवदे(6गुण);
अंजनेय फाटक (6 गुण) पराभुत वि.राम परब(7 गुण);
अवधूत ब्रह्मे(6गुण) पराभुत वि.वीरेश शरनार्थी(7गुण);
आरव अय्यर (6.5गुण)बरोबरी वि.मिहिर शहा(6.5गुण);
अनुष्का कुतवाल (6 गुण) पराभुत वि.नमीत चव्हाण (7 गुण);
प्रथमेश शेरला(6.5गुण) बरोबरी वि.आशिष चौधरी (6.5गुण);
हितांश जैन (6 गुण) पराभुत वि.ओम लामकाने(7 गुण);
विहान दावडा (7गुण)वि.वि.निशांत जवळकर (6गुण);
सुभाष नायडू (5.5 गुण) पराभुत वि.अभिषेक केळकर(6.5 गुण);
सिद्धांत साळुंके (5.5 गुण) पराभुत वि.हर्षल पाटील (6.5 गुण);
जीत शहा(6.5 गुण)वि.वि.अमेय चौधरी (5.5 गुण);
शाश्वत गुप्ता(6गुण) बरोबरी वि.सौरभ म्हामणे(6गुण);
हेरंब इंगळे (6.5 गुण)वि.वि.धनश्री खैरमोडे (5.5 गुण);