July 27, 2024

तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत आश्विन नरसिंघानीचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

पुणे,दि.8 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आश्विन नरसिंघानी याने सातव्या मानांकित सार्थ बनसोडेचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित पार्थ देवरुखकरने सहाव्या मानांकित ओंकार शिंदेचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 6-3 असा तर, तिसऱ्या मानांकित जय पवारने आर्यन घाडगेचा 6-2, 1-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित अनमोल नागपुरेने पाचव्या मानांकित फतेहब सिंगचा 6-2, 6-0 असा सहज पराभव केला.
मुलींच्या गटात आठव्या मानांकित आनंदी भुतडाने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या गुजरातच्या सावी पांचाळला 6-1, 6-2 असे पराभुत केले. स्वानिका रॉयने आपली शहर सहकारी काव्या देशमुखचे आव्हान 6-1, 6-1 असे मोडीत काढले. पुण्याच्या श्रेया पठारेने संचीता नगरकरचा 6-1, 7-5 असा तर, महाराष्ट्राच्या
ध्रुवी आद्यंतयाने तामिनाडूच्या सहना कमलाकन्ननचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत सार्थ बनसोडे व अर्णव बनसोडे यांनी फतेहब सिंग व रौनक लालवानी यांचा 4-6, 7-5, 10-2 असा तर, नीव कोठारी व सुहास सोमा यांनी अनमोल नागपुरे व सात्विक कोल्लेपल्ली यांचा 7-6(4), 3-6, 10-7 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
पार्थ देवरुखकर(महा)(1)वि.वि.ओंकार शिंदे(महा)(6)7-6(2), 6-3;
जय पवार(महा)(3)वि.वि.आर्यन घाडगे (महा)6-2, 1-6, 6-3;
अनमोल नागपुरे(महा)(4)वि.वि.फतेहब सिंग(महा)(5)6-2, 6-0;
आश्विन नरसिंघानी (महा) वि.वि.सार्थ बनसोडे(महा)(7) 6-4, 6-4;
मुली:
आनंदी भुतडा(महा)(8) वि.वि.सावी पांचाळ (गुजरात) 6-1, 6-2;
स्वानिका रॉय (महा) वि.वि.काव्या देशमुख(महा) 6-1, 6-1;
श्रेया पठारे(महा)वि.वि.संचीता नगरकर(महा)6-1, 7-5;
ध्रुवी आद्यंतया (महा) वि.वि.सहना कमलाकन्नन(तामिळनाडू)7-5, 6-3;
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
जय पवार/पार्थ देवरुखकर(1) वि.वि.अथ्रेया हयाग्रवे/प्रणव एसआर 6-1, 6-3;
सार्थ बनसोडे/अर्णव बनसोडे वि.वि.फतेहब सिंग/रौनक लालवानी(3) 4-6, 7-5, 10-2;
ओंकार शिंदे/अश्विन नरसिंघानी (4)वि.वि.अर्चित धूत/पार्थ सोमाणी 6-4, 6-3;
नीव कोठारी/सुहास सोमा वि.वि.अनमोल नागपुरे/सात्विक कोल्लेपल्ली (2)7-6(4), 3-6, 10-7.