पुणे, दि.२३/०२/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व आजीवन अध्ययन व विकास विभागाचे संचालक डॉ. विलास आढाव, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र, उपकुलसचिव प्रदीप कोळी, अधिसभा सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

More Stories
Pune: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना
तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रो स्थानकावरील AFC गेट्स; पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय
Pune: ई-चलनाविरोधात ५ मार्चपासून वाहतूकदारांचे बेमुदत आंदोलन