May 18, 2024

महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर सेहजवीर सिंग मरास, मायशा परवेझ आघाडीवर

पुणे, 29 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर खुल्या गटात नागपूरच्या सेहजवीर सिंग मरास याने तर, मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या मायशा परवेझ या खेळाडूंनी 6 गुणांसह संयुक्तरित्या आघाडी प्राप्त केली आहे. 
 
कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सहाव्या फेरीत नागपूरच्या सेहजवीर सिंग मरास याने पुण्याच्या अविरत चौहानचा पराभव करून 6 गुणांसह आघाडी मिळवली. पुण्याच्या आदित्य जोशीने आपला शहर सहकारी आरुष डोळसचा पराभव करून 5.5गुण मिळवले. मुंबई उपनगरच्या विराज राणेने नागपूरच्या शौनक बडोलेला नमविले.  
 
मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या मायशा परवेझने औरंगाबादच्या भूमिका वाघलेचा पराभव करून 6 गुणांची कमाई केली. तर, नागपूरच्या वेदिका पाल हिने मुंबई उपनगरच्या हिरणमयी कुलकर्णीचा पराभव करून 5गुण प्राप्त केले.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सहावी फेरी: खुला गट: 
सहजवीर सिंग मरस(नागपूर) (6 गुण)वि.वि.अविरत चौहान(पुणे) (5 गुण);
आदित्य जोशी (पुणे)(5.5गुण)
 वि.वि.आरुष डोळस (पुणे) (5 गुण);
विराज राणे (मुंबई उप) (5.5 गुण) 
 वि.वि.शौनक बडोले(नागपूर (4 गुण);
अभय भोसले (कोल्हापूर) (5 गुण)
 वि.वि.अमेय चौधरी (पुणे) (4 गुण);
अर्जुन सिंग (मुंबई उपनगर)(5 गुण)
 वि.वि.आर्यन वाघमारे(ठाणे) (4गुण);
सिद्धांत भारती (मुंबई उप)(4.5गुण)बरोबरी वि.अद्विक अग्रवाल (पुणे)(4.5गुण);
सिद्धांत साळुंके (पुणे)(5 गुण)
 वि.वि.आहान माथूर(मुंबई उपनगर)(4 गुण);
भानुशाली नेमाइ(मुंबई उपनगर)(5गुण)
वि.वि.अद्वय बेंडे(पुणे)(4गुण);
क्षितिज प्रसाद(पुणे)(5गुण)वि.वि.प्रतीक तांबी(अमरावती)(4गुण);
शाश्वत गुप्ता (पुणे) (5 गुण) वि.वि.आरव पाटील (कोल्हापूर) (4गुण);
 
मुली:
मायशा परवेझ (मुंबई उपनगर)(6गुण)
वि.वि.भूमिका वाघले(औरंगाबाद)(4.5गुण);
हिरणमयी कुलकर्णी (मुंबई उपनगर)(4गुण)पराभुत वि.वेदिका पाल(नागपूर)(5गुण);
अन्वी हिरडे(नागपूर)(5गुण)
वि.वि.दिव्यांशी खंडेलवाल (नागपूर)(4गुण);
त्वेश जैन(मुंबई शहर)(5गुण)वि.वि.जीविका चोप्रा(रायगड)(4गुण);
अन्विता ठकार (मुंबई उपनगर)(4गुण)पराभुत वि.खनक पहारिया(मुंबई उपनगर)(5गुण);
चतुर्थी परदेशी (पुणे)(4.5गुण)
वि.वि.प्रांजल राऊत (पुणे)(3.5गुण);
सिद्धी बुबणे(कोल्हापूर)(4गुण)बरोबरी वि.अनुजा कोळी(सांगली) (4 गुण);
निधी खिवंसरा(पुणे)(4गुण)
वि.वि.स्वधा दातीर(यवतमाळ)(3गुण);
काव्या वाघचौरे (औरंगाबाद)(3.5 गुण) बरोबरी वि.सान्वी गोरे (सोलापूर)(3.5गुण);