May 9, 2024

महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मुंबई उपनगरच्या विराज राणे, मायशा परवेझ यांना विजेतेपद

पुणे, 30 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित व ट्रूस्पेस, कोरस व एसपी यांनी प्रायोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात मुंबई उपनगरच्या विराज राणे याने तर, मुलींच्या गटात मायशा परवेझ या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
 
कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत खुल्या गटात मुंबई उपनगरच्या विराज राणेने कोल्हापूरच्या अभय भोसलेला 12 चालींमध्ये बरोबरीत रोखले. विराज याने 8 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. विराज हा न्यु होरायजन पब्लिक स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकत आहे. पुण्याच्या आरुष डोळसने नागपूरच्या सेहजवीर सिंग मरासचा पराभव करून 7.5 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या शाश्वत गुप्ताने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या विराज राणेला करंडक व 3500रुपये तर, उपविजेत्या आरुष डोळसला करंडक व 2000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. 
 
अश्वमेध सभागृह येथे पार पडलेल्या मुलींच्या गटात नवव्या फेरीत मुंबई उपनगरच्या मायशा परवेझने मुंबई शहरच्या त्वेशा जैनचा पराभव करून 8.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. मायशाने इटालियन पद्धतीने डावास सुरुवात करत त्वेशावर 50 चालीमध्ये मात केली. मायशा ही बिलाबाँग इंटरनॅशनल शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. नागपूरच्या वेदिका पाल हिने मुंबई उपनगर च्या अन्विता ठकार चा पराभव करून 7.5 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. नागपूरच्या दिव्यांशी खंडेलवालने कोल्हापूरच्या सिद्धी कर्वेचा पराभव करून 7 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील मुलींच्या गटातील विजेत्या मायशा परवेझला करंडक व 3500रुपये, तर उपविजेत्या वेदिका पाल हिला करंडक व 2000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष व ट्रुस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल, स्नार्क पावर लिमिटेडच्या इंजिनिअरिंग व सप्लाय चेन विभागाचे व्यवस्थापक रोहीत मदन, पीडीसीसीचे सचिव डॉ.संजय करवडे, पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, डॉ. दिपक रिपोटे, चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे, स्पर्धा संचालक विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते,  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 9वी फेरी: खुला गट:
विराज राणे (मुंबई उपनगर)(8गुण) बरोबरी वि.अभय भोसले (कोल्हापूर)(7गुण);
आरुष डोळस (पुणे)(7.5 गुण)वि.वि.सेहजवीर सिंग मरास(नागपूर)(7 गुण);
शाश्वत गुप्ता(पुणे)(7.5गुण)
 वि.वि.आदित्य जोशी(पुणे)(6.5गुण);
शौनक बडोले (नागपूर)(7
गुण) वि.वि.अर्जुन सिंग(मुंबई उपनगर)(6.5 गुण);
आर्यन वाघमारे(ठाणे)(7गुण) वि.वि.हीत बलदवा (कोल्हापूर)(6गुण);
क्षितीज प्रसाद (पुणे)(6गुण) पराभुत 
वि.सिद्धांत साळुंके (पुणे)(6गुण);
अद्विक अग्रवाल (पुणे)(6.5गुण)वि.वि.मुकील आर (रायगड) (5.5गुण);
भानुशाली नेमाय(मुंबई उपनगर)(6गुण) बरोबरी वि.प्रभू अर्जुन(मुंबई उपनगर)(6गुण);
राघव पावडे(पुणे)(6.5गुण) वि.वि.ओम रामगुडे(पुणे)(5.5गुण);
आहान माथूर(मुंबई उपनगर)(6गुण) बरोबरी 
वि.युग बरडिया(पुणे)(6गुण);
अमेय चौधरी (पुणे)(6.5 गुण)वि.वि.अभिलाश यादव (रायगड)(5.5 गुण);
 
 
मुली:
त्वेशा जैन(मुंबई शहर)(6गुण) पराभुत 
वि.मायशा परवेझ (मुंबई उपनगर)(8.5 गुण);
वेदिका पाल (नागपूर)(7.5 गुण)वि.वि.अन्विता ठकार (मुंबई उपनगर)(6 गुण);
खनक पहारिया (मुंबई उपनगर)(6.5गुण)बरोबरी वि.भूमिका वाघले(औरंगाबाद)(6.5गुण);
सिद्धी कर्वे (कोल्हापूर)(5.5गुण) पराभुत वि.दिव्यांशी खंडेलवाल (नागपूर)(7गुण);
अन्वी हिरडे (नागपूर)(6.5 गुण)वि.वि.साजिरी देशमुख(सातारा)(5.5 गुण);
स्वधा दातीर (यवतमाळ)(5.5 गुण)वि.वि.सान्वी गोरे(सोलापूर)(6 गुण);
ओवी पावडे(पुणे)(6गुण)वि.वि.सिद्धी बुबणे(कोल्हापूर)(5गुण);
याशिका मुसळे (नागपूर) (5गुण) पराभुत वि.देविका पिंगे (मुंबई शहर)(6गुण);
मिहिका बोले (पुणे) (5गुण) पराभुत वि.निधी खिवंसरा (पुणे) (6गुण);
देवांश्री गावंडे (औरंगाबाद)(5 गुण) पराभुत वि.जीविका चोप्रा(रायगड) (6 गुण);
चतुर्थी परदेशी (पुणे)(4.5 गुण) पराभुत वि.तन्मयी घाटे(सातारा)(5.5 गुण);
प्रांजल राऊत (पुणे)(4.5 गुण) पराभुत वि.हिरणमयी कुलकर्णी (मुंबई उपनगर)(5.5 गुण)