पुणे, ५ जून २०२५: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे अडचणीत सापडले असून त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येत आहे. अश्यातच आज पुन्हा एकदा त्यांच्यावर एका प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहे. अमरावती येथील एका कैद्यांकडून सोडण्यासाठी ५५० कोटींची खंडणी मागणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पुण्यातील विविध गुन्ह्यात अमरावती तुरुंगात असलेले नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या कैद्यांचे वकील निवृत्ती कराड यांनी आरोप केले आहेत. कराड यांनी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत जालिंदर सुपेकर यांच्यावर ५५० कोटींची खंडणी मागितल्याच आरोप केलं आहे.
याबाबत वकील निवृत्ती कराड म्हणाले, “ज्यांचं वकील पत्र घेतलं आहे ते नानासाहबे गायकवाड आणि गणेश गायकवाड हे २०१२ पासून न्यायालयीन बंदिस्त असून ते इथे असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अमरावती कारागृहात वर्ग करण्यात आले होते.” १९ ऑगस्ट २०२३ रोजी जालिंदर सुपेकर हे महानिरीक्षक असताना त्यांनी त्या जेलला विझीट केली आणि सकाळी ९.३० – १२.३० मध्ये नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना एका बंदिस्त रूम मध्ये बोलावलं आणि त्यांना धमकावण्यात आलं असल्याचा आरोप कराड यांनी केला आहे.
“तुझी १५०० कोटी ची संपत्ती असून तू मला ५५० कोटी दे तुझी या सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष सुटका करतो”, अशी मागणी सुपेकरांनी केलं असल्याचही यावेळी म्हणण्यात आलेल आहे. “याबाबत आम्ही नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने त्यांना नोटीस देखील दिली आहे,” अस यावेळी कराड म्हणाले.
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर विविध आरोप होत असताना आता नाना गायकवाड यांच्या प्रकरणात देखील त्यांच्यावर ५५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच आरोप होत असल्याने सुपेकर हे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा