May 18, 2024

एमएसएलटीए तर्फे आयोजित रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर टेनिस स्पर्धेत स्मित उंद्रे , तमन्ना नायर, स्वरा जावळे यांचा विजय

मुंबई, 13 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या स्मित उंद्रे , ध्रुव सहगल , तमन्ना नायर, स्वरा जावळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत स्मित उंद्रेने कर्नाटकच्या कामन मूर्तीचा 6-1, 6-1 असा तर राजस्थानच्या अव्वल मानांकीत विवान मिर्धाने गुजरातच्या दक्ष तिलवाणीचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. गुजरातच्या पाचव्या मानांकीत हीत कंडोरियाने आसामच्या नमन बोराहचा 6-3,6-1 असा तर हरयाणाच्या सहाव्या मानांकीत आरव जाखरने तेलंगणाच्या ईशान सोहनीचा 6-0, 6-4 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या तमन्ना नायरने उत्तर प्रदेशच्या मिशिका कंदपालचा 6-0, 6-4 असा तर स्वरा जावळेने कर्नाटकच्या पद्मा रमेशकुमारचा 6-2, 6-0 असा पराभव करत दुस-या फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- मुले
विवान मिर्धा (राजस्थान)(1) वि.वि दक्ष तिलवाणी(गुजरात) 6-1, 6-0
स्मित उंद्रे (महाराष्ट्र) (3) वि.वि कामन मूर्ती (कर्नाटक) 6-1, 6-1
हीत कंडोरिया (गुजरात) (5) वि.वि नमन बोराह (आसाम) 6-3,6-1
आरव जाखर(हरयाणा)(6) वि.वि ईशान सोहनी(तेलंगणा) 6-0, 6-4
चांदोग्या पाठक (आसाम) (8) वि.वि आरव छल्लानी (महाराष्ट्र) 6-2, 6-0
रॉनी विजय कुमार (तमिळनाडू) (9) वि.वि नमिष हूड ( महाराष्ट्र ) 7-6(2),6-2
अथर्व हंद्रत्ता ( कर्नाटक) वि.वि कृषय तावडे ( महाराष्ट्र ) 6-1, 6-0
एम पुणेत( कर्नाटक ) वि.वि सुजाई पोथुला(तेलंगणा) 6-1, 6-1
अरहान जैन ( कर्नाटक ) वि.वि स्वप्नील घोष (पश्चिम बंगाल) 6-1, 6-1
ऋषव प्रसाद ( पश्चिम बंगाल) वि.वि ईशानदीप बोरो (आसाम) 6-2, 6-1
निर्वाण मार्गना (तेलंगणा) वि.वि सिद्धार्थ कंदुकुरी( कर्नाटक) 6-4,2-6,6-2
लेमुएल अल्लाडी (तेलंगणा) वि.वि मयंक गुप्ता (पंजाब) 6-3,6-1
ईशान सुदर्शन(तमिळनाडू) वि.वि आरव मुळे( महाराष्ट्र ) 6-2, 6-1
ध्रुव सहगल ( महाराष्ट्र ) वि.वि रोनक हरियानी (राजस्थान) 6-0, 6-0
कबीर परमार (गुजरात) वि.वि गोरेश बैसला (हरयाणा) 6-0, 6-1
भावेश शाह (गुजरात) वि.वि जोश माहेश्वरी (उत्तर प्रदेश) 7-5, 6-1
शाहबाज संघेरा (पश्चिम बंगाल) वि.वि तनिश वुंड्याला (तेलंगणा) 6-2, 6-4
माधव दधीच (कर्नाटक) वि.वि ओजस शर्मा (उत्तर प्रदेश) 7-6(5), 6-0
अनिकेत सिंग (उत्तर प्रदेश) वि.वि धीरव कोठारी ( महाराष्ट्र) 6-0, 6-0

मुली-
तमन्ना नायर ( महाराष्ट्र ) वि.वि मिशिका कंदपाल ( उत्तर प्रदेश ) 6-0, 6-4
स्वरा जावळे ( महाराष्ट्र ) वि.वि पद्मा रमेशकुमार ( कर्नाटक ) 6-2, 6-0
जान्हवी तम्मिनेदी (आंध्र प्रदेश) वि.वि अंशिका झा ( उत्तर प्रदेश ) 6-3, 6-2
अक्षिता अंतिल (दिल्ली) वि.वि मेगालाई प्रकाश (पुडुचेरी) 6-0, 6-0
हर्षा ओरुगंती ( आंध्र प्रदेश ) वि.वि माहिरा भाटिया (उत्तराखंड) 6-1, 6-2
सहज लखत (पंजाब) वि.वि एसके शझफा ( पश्चिम बंगाल) 6-0, 6-0
एशिथा श्रीयाला ( आंध्र प्रदेश ) वि.वि जोहा कुरेशी (तेलंगणा) 6-0, 6-0
दीप्ती व्यंकटेशन (तमिळनाडू) वि.वि धृती गुंडू (तेलंगणा) 6-4, 6-1
अवनी पुनागंटी(कर्नाटक) वि.वि आन्या सोनी(दिल्ली) 6-3, 6-1