पुणे, 8 फेब्रूवारी 2023: सेंट व्हिन्सेंट हायस्कूल पुणे कॅम्प यांच्या वतीने आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनिअर फुटबॉल लीग 2023 स्पर्धेत साखळी फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कुल संघाने सलग तिसरा विजय नोंदवला.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल पुणे कॅम्प येथील मैदानावर दर आठवड्याच्या शनिवारी होत असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अंध लोढा(2,14, 22मि.) याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट स्कुल संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचा 4-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अझलान लांडगे, जोनाह अंबाट यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट स्कूल संघाने ह्यूम मॅकहेन्री संघाचा 2-0 असा पराभव केला.
अन्य लढतीत हचिंग्ज स्कूल संघाने लॉयला स्कुल संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विद्या व्हॅली संघाने आर्यन वर्ल्ड स्कुलचा 2-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून मल्हार देशमुख(3,19 मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. सेंट पॅट्रिक्स व विद्या व्हॅली यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. सिनन सय्यद(1,6,20 मि.) याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर ह्यूम मॅकहेन्री संघाने श्री श्री रविशंकर विद्या मंदिरचा 3-2 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
विद्या व्हॅली: 2 (मल्हार देशमुख 3,19 मि.)वि.वि.आर्यन वर्ल्ड स्कुल: 0;
विद्या भवन शाळा: 1 (अर्णव भोसले 5 मि.) वि.वि.कल्याणी स्कुल: 0;
हचिंग्ज स्कूल: 2 (शौर्य परदेशी 6 मि., अर्णव शेरेकर 7 मि.) वि.वि.लॉयला स्कुल: 1 (इव्हान अॅलेक्स 2 मि.);
आर्यन वर्ल्ड स्कूल: 1 (सोहम दळवी 2 मि.) वि.वि.ह्यूम मॅक हेन्री: 0;
हचिंग्ज स्कूल: 2 (अरमान ओसवाल 10, 23 मि.) वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 1 (ऋषिब के. 9 मि.);
सेंट पॅट्रिक्स: 0 बरोबरी वि.विद्या व्हॅली: 0;
विद्या भवन: 1 (अर्णव भोसले 15 मि.)वि.वि.ऑर्बिस स्कूल: 0;
सेंट व्हिन्सेंट स्कुल: 4 (अंध लोढा 2,14, 22 मि. जोनाह अंबट 5 मि.) वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 0;
सेंट व्हिन्सेंट स्कूल: 2 (अझलान लांडगे 5 मि. जोनाह अंबाट 17 मि.) वि.वि.ह्यूम मॅकहेन्री: 0;
ह्यूम मॅकहेन्री: 3 (सिनन सय्यद 1,6,20 मि.) वि.वि.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर: 2 (रुतम महेजर 17 मि., आरव तनपुरे 21 मि.)
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी