October 3, 2024

एमएसएलटीए वार्षिक मानांकन यादीत पुण्यातील अर्जुन कढे, ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर, मानस धामणे, आस्मि आडकर, अर्णव पापरकर यांना अग्रमानांकन

पुणे, 9 फेब्रुवारी 2023: एमएसएलटीए वार्षिक मानांकन 2022 यादीत महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू ऋतुजा भोसले, वैष्णवी आडकर, आस्मि आडकर, पार्थसारथी मुंडे, तमन्ना नायर, ऐश्वर्या जाधव यांसह अर्जुन कढे, मानस धामणे, अर्णव पापरकर, दक्ष पाटील, अधिराज दुधाने या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या 2022ची वार्षिक मानांकन यादी जाहीर करताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि एमएसएलटीएच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले की, एमएसएलटीएच्या वतीने आपल्या राज्यात आयोजित केलेल्या दर्जेदार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे, खेळाडूंना त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करता आली, याचा आम्हाला आनंद आहे. यामध्ये 2022च्या वार्षिक मानांकन यादीत राज्यातील सात खेळाडूंनी देशात विविध वयोगटात अव्वल पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

तसेच, 2022 मध्ये राज्यातील खेळाडूंमध्ये पुण्यातील नऊ खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले असून यामध्ये अर्जुन कढे(पुरुष गट), ऋतुजा भोसले(महिला गट), वैष्णवी आडकर(18वर्षाखालील मुली), मानस धामणे(16 व 18 वर्षाखालील मुले), आस्मि आडकर(16वर्षाखालील मुली), अर्णव पापरकर(14वर्षांखालील मुले), दक्ष पाटील(12वर्षांखालील मुले),अधिराज दुधाने(10वर्षांखालील मुले) यांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या तमन्ना नायर(10 वर्षांखालील मुली), सोलापूरच्या पार्थसारथी मुंढे(12 वर्षांखालील मुली), कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव(14 वर्षांखालील मुली) या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

2022या वर्षात एमएसएलटीएच्या वतीने 65हुन अधिक स्पर्धांचे आयोजन केले असून यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय स्पर्धा(टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी 250, 3 आयटीएफ महिला, 1 आयटीएफ पुरुष, 2 आयटीएफ ज्युनियर स्पर्धा, 5आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धा), 36 एआयटीए मानांकन स्पर्धा व 10 वर्षांखालील राज्य मानांकन 17 स्पर्धांसह राज्यातील जिल्हास्तरीय व झोनल स्पर्धांचा समावेश आहे.

पुणे विभागात 30 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 7 देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा, मुंबई विभागात 13 स्पर्धांचे आयोजन यामध्ये 2आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 6 एआयटीए मानांकन स्पर्धा आणि 5 राज्य मानांकन टेनिस स्पर्धा, तर कोल्हापूर विभागात 7 स्पर्धा, औरंगाबादमध्ये 6 स्पर्धा यामध्ये 1 आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धा, नवी मुंबईमध्ये 1 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सोलापूर व नागपूरमध्ये 2 स्पर्धा आणि नाशिकमध्ये 1 टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, राज्यातील आपल्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामुळे या खेळाडूंना आपले मानांकन सुधारण्यास मदत होत आहे.2022च्या वार्षिक मानांकन यादीत राज्यातील सात मुलींनी देशातील विविध गटात अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

प्रत्येक गटातील अव्वल तीन खेळाडूंना, गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना, खेलो इंडिया युथ गेम्समधील विजेते, प्रशिक्षक, उत्कृष्ट जिल्हा टेनिस संघटना यांचा सत्कार म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात 4 मार्च रोजी करण्यात येणार असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

विविध वयोगटानुसार अव्वल 8 खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे

10 वर्षाखालील मुले: 1. अधिराज दुधाणे (पुणे), 2. आरव छल्लानी (नवी मुंबई), 3. तक्षशील नगर (पुणे), 4. आरव बेले (पुणे), 5. वीर चतुर (पुणे), 6. सोहम राठोड (सोलापूर) ), 7. नीव शेठ (सांगली), 8. श्लोक आलंद (सोलापूर)

10 वर्षांखालील मुली: 1. तमन्ना नायर (नवी मुंबई), 2. सृष्टी सूर्यवंशी (पुणे), 3. मायरा शेख (पुणे), 4. शमिक्षा शेट्टी (मुंबई), 5. हर्षा देशपांडे (कोल्हापूर), 6. नक्षत्र अय्यर ( पुणे), 7. अविघ्न अंतड (सोलापूर), 8. तृषा भोसले (नवी मुंबई)

12 वर्षांखालील मुले: 1. दक्ष पाटील (पुणे), 2. शौनक सुवर्ण (कोल्हापूर), 3. जय गायकवाड (सोलापूर), 4. दर्श खेडेकर (मुंबई), 5. प्रज्ञेश शेळके (पुणे), 6. वरद (पुणे), 7. ऋषिकेश माने (नवी मुंबई), 8. स्मित उंद्रे (पुणे)

12 वर्षांखालील मुली: 1. पार्थसारथी मुंढे (सोलापूर), 2. स्वनिका रॉय (पुणे), 3. रितिका डावलकर (कोल्हापूर), 4. वृंदिका राजपूत (औरंगाबाद), 5. ईशाल पठाण (मुंबई), 6. जान्हवी चौगुले (इचलकरंजी), 7. सृष्टी सूर्यवंशी (पुणे), 8. रित्सा कोंदकर (पुणे)

14 वर्षांखालील मुले: 1. अर्णव पापरकर (पुणे), 2. समर्थ साहित्य (मुंबई), 3. शिवतेज शिरफुले (नांदेड), 4. ओम वर्मा (नवी मुंबई), 5. दक्ष कुक्रेती (नवी मुंबई), 6. आयुष पूजारी (मुंबई), 7. वेदांत भसीन (मुंबई), 8. अवनीश चाफले (पुणे)

14 वर्षांखालील मुली: 1. ऐश्वर्या जाधव (कोल्हापूर), 2. आकृती सोनकुसरे (सोलापूर), 3. नैनिका रेड्डी बेंद्रम (सोलापूर), 4. सेजल भुतडा (नागपूर), 5. मेहक कपूर (पुणे), 6. रिद्धी शिंदे (एम) देवंशी प्रभुदेसाई (पुणे), 8. देवश्री महाडेश्वर (मुंबई)

16 वर्षांखालील मुले: 1. मानस धामणे (पुणे), 2. समर्थ साहित्य (मुंबई), 3. पार्थ देवरुखाकर (पुणे), 4. वेदांत भसीन (मुंबई), 5. काहिर वारिक (मुंबई), 6. स्वर्मन्यू सिंग (मुंबई), 7. दक्ष कुक्रेती (पुणे), 8. करण रावत (नवी मुंबई)

16 वर्षांखालील मुली: 1. आस्मि अडकर (पुणे), 2. आकृती सोनकुसरे (सोलापूर), 3. ऐश्वर्या जाधव (कोल्हापूर), 4. सेजल भुतडा (नागपूर), 5. नैनिका रेड्डी बेंद्रम (सोलापूर), 6. केकायरा चेतनानी (मुंबई), 7. सिया प्रसादे (पुणे), 8. जेनिका जैसन (मुंबई)

18 वर्षांखालील मुले: 1. मानस धामणे (पुणे), 2. निशित रहाणे (पुणे), 3. तनिष्क जाधव (पुणे), 4. दक्ष अग्रवाल (पुणे), 5. काहिर वारिक (मुंबई), 6. साहेब सोधी मुंबई, 7. प्रज्वल तिवारी (मुंबई), 8. अर्जुन अभ्यंकर (पुणे)

18 वर्षांखालील मुली: 1. वैष्णवी आडकर (पुणे), 2. मधुरिमा सावंत (पुणे), 3. सोनल पाटील (कोल्हापूर), 4. आस्मि अडकर (पुणे), 5. रुमा गायकवारी (पुणे), 6. आकृती सोनकुसरे (सोलापूर), 7. सेजल भुतडा (नागपूर), 8. कैरा चेतनानी (मुंबई)

पुरुष : 1. अर्जुन कढे(पुणे), 2. संदेश कुरळे (कोल्हापूर), 3. अथर्व शर्मा (पुणे)

महिला : 1. ऋतुजा भोसले (पुणे), 2. आकांक्षा नित्तुरे (नवी मुंबई), 3. वैष्णवी आडकर (पुणे).