कोल्हापूर, 26 मे 2024: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मूळच्या गटात हरियाणाच्या तविश पाहवा याने तर, मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने पंजाबच्या तिसऱ्या मानांकित रांझना संग्रामचा 6-1,6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 30मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पार्थसारथीने रांझनाची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-1 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये पार्थसारथीने रांझनाची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत दहाव्या मानांकित हरियाणाच्या तविश पाहवाने आपला राज्य सहकारी अव्वल मानांकित प्रतीक शेरॉनचा 6-4, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
स्पर्धेचे पारितोषीक वितरण केडीएलटीएचे चेअरमन दिलीप मोहिते, एमएसएलटीएचे सह सचिव शितल भोसले, केडीएलटीएचे आजीव सदस्य मुरलीधर घाटगे,केडीएलटीएचे आजीव सदस्य आशिष शहा, आनंद शहा, शेखर शिंदे, भरत पाटील, विजय पत्की, महेंद्र परमार, एसएस मोमीन, वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: मुख्य ड्रॉ: मुले: अंतिम फेरी:
तविश पाहवा(हरियाणा) (10)वि.वि.प्रतीक शेरॉन(हरियाणा)(1)6-4, 6-0;
मुली:
पार्थसारथी मुंढे(महा)(10)वि.वि.रांझना संग्राम(पंजाब)(3) 6-1, 6-3;
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला