पुणे, १५ फेब्रुवारी २०२३: नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. १५.२.२०२३ रोजी पुणे विभागातील सातारा – पुणे विभागाची पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी सातारा, वाठार आणि जेजुरी स्थानकांची पाहणी करून प्रवाशांच्या सोयी-सुविधा इत्यादींचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी स्थानक, रनिंग रूम , लेव्हल क्रॉसिंग गेट, पॅनल आणि रिले रूम, पूल, रेल्वेमार्ग इत्यादींची बारकाईने पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी सातारा येथे नवीन स्थानक इमारतीला भेट दिली. सातारा येथे त्यांनी स्थानक परिसर, अपघात निवारण वैद्यकीय कोच, लोको पायलट आणि गार्ड कक्षाची पाहणी करून व्यवस्था पाहिली. तसेच रनिंग रूममध्ये उपलब्ध असलेल्या अन्न व पिण्याच्या पाण्याच्या दर्जाची पाहणी केली .तसेच सातारा येथील ट्रॅक्शन सबस्टेशनचीही त्यांनी पाहणी केली. सातारा – वाठार दरम्यान स्पीड ट्रायल करण्यातआले . वाठार स्थानक येथे महाव्यवस्थापकांनी स्थानक परिसर आणि रेल्वे कॉलनी तसेच आदर्की ते सालपा दरम्यानच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट आणि बोगद्याची पाहणी केली.
महाव्यवस्थापकांनी जेजुरी स्थानकासह तेथील प्रवासी सुविधा, जेजुरी ते राजेवाडी दरम्यान मर्यादित उंचीचा भुयारी मार्ग आणि टॉवर वॅगन शेडही कार्यान्वित केली. लालवानी यांनी आंबळे ते शिंदवणे दरम्यानच्या पुलाची व वळणाचीही पाहणी केली. पुण्यातील कोचिंग मेंटेनन्स डेपोतील देखभाल दुरुस्तीच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली.
या पाहणीदरम्यान पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, प्रधान विभागप्रमुख आणि पुणे विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी