पुणे, ७ जून २०२५ ः “राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा किंवा प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही. आम्ही सामूहिक नेतृत्वातच्या माध्यमातून निर्णय करतो, त्यामध्ये चर्चा होते. भाजपबरोबर जाण्याबाबत अनेकदा चर्चा झाली, शेवटी आम्हीच सामूहिक निर्णय घेऊन भाजप सरकारमध्ये गेलो. आता ज्यांना आमच्या विचारांबरोबरच जोडले जायचे आहे, ते आमच्या पक्षासोबत जोडले जाऊ शकतात.’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला बगल दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या १० जून रोजी म्हाळूंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या २६ व्या वर्धापनदिनाची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, “राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यासाठी २०१४ नंतर २०१६ मध्ये चर्चा अंतिम टप्प्यात पोचली. लोकसभेच्या जागा वाटपाबाबतही चर्चा झाली. पुढे २०१९ व २०२२ मध्येही चर्चा झाली, तिथपर्यंत पोचलो. पण तसे घडले नाही. नंतर आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक निर्णय घेऊन भाजपबरोबर सरकारमध्ये गेलो. आता ज्यांना आमच्या विचारांबरोबर यायचे ते येऊ शकतात. त्यादृष्टीने आमच्याकडे अनेकांचे पक्षप्रवेश होणार आहेत.’
महापालिका निवडणुकीबाबत तटकरे म्हणाले, “महायुती म्हणूनच महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदांमधील राजकीय परिस्थितीचा विचार करून निवडणूक लढवू. महायुतीला तडा जाणार नाही, याची महापालिका निवडणुकीत काळजी घेतली जाईल. तिन्ही पक्ष एकत्र विचार करून निर्णय घेतील.’
तटकरे म्हणाले, पक्षाकडील अपेक्षांवर होणार चर्चा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्धापनदिनाचा कार्यक्रम होईल. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मागील दोन वर्षांचा आढावा घेऊन कार्यकर्ते व जनतेच्या अपेक्षांची पूर्ततेवर चर्चा होईल. यावेळी पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील.
महाविकास आघाडी एकत्र नाही, महायुती एकत्र. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हेगारी वृत्ती पासून दूर रहावे. गुन्हेगारी कृत्य केल्यास पक्षाकडून कारवाई व गुन्हेही दाखल होणार. लाडकी बहिणीसाठी इतरांचा निधी वळविलेला नाही, त्याच घटकातील महिलांना निधीचा लाभ झाला आहे.
More Stories
Pune: महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार
Pune: बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग झाला मोकळा
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा